छत्तीसगड येथे ते 03 ते 05 एप्रिल 2026 दरम्यान सुरु असलेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मल्लखांब या क्रीडा प्रकारात श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती. बी.पी.एड. प्रथम वर्षीय, विद्यार्थिनी खेळाडू नेहा दारसिंबे व नीलाक्षी दारसिंबे यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले व महाराष्ट्र संघाला द्वितीय🥈 क्रमांक प्राप्त झाले,तसेच पोल मल्लखांब पिरॅमिड मध्ये द्वितीय🥈 क्रमांक व रोप मल्लखांब पिरॅमिड मध्ये तृतीय🥉 क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्र संघाने उज्वल कामगिरी केली. याकरिता महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या आपल्या महाविद्यालयातील दोन्ही बहिणी यांचे हार्दिक अभिनंदन व गेम इन्चार्ज प्रा. डॉ. चेतक शेंडे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन हॅन्डबॉल अंतिम स्पर्धेमध्ये श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीने मिळवले विजेतेपद
आज शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती
यांच्या मुलांच्या हँडबॉल संघाने अंतिम फेरीत भक्कम विजय मिळवला आहे!
या सगळ्यांच्या जोरावर आजचा ऐतिहासिक विजय शक्य झाला!
आपल्या महाविद्यालयाच्या मुलांच्या हॅन्डबॅल संघाने Zone Final मध्ये शानदार विजय मिळवला आहे. हा विजय कठोर परिश्रामचा संघभावनेचा आणि उत्कृष्ठ खेळ कौशल्याचा परिणाम आहे